टॉप बातम्या

रासा येथे किसान सभेची शाखा स्थापन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : महाराष्ट्र राज्य किसान सभा द्वारा शाखा बांधणी व सभासद नोंदणी अभियानांतर्गत वणी तालुक्यातील रासा या गावात शाखा स्थापन करण्यात आली. 

याप्रसंगी झालेल्या सभेत काॅ.अनिल हेपट, काॅ.अनिल घाटे, अथर्व निवडिंग, यांनी मार्गदर्शन‌ केले. याप्रसंगी किसान सभेची शाखा स्थापन करुन शाखा कौंसील निवडण्यात आली. 

त्यामध्ये शाखा अध्यक्ष निखील वरारकर, उपाध्यक्ष अजिंक्य बलकी, सचिव सुरेश चौधरी, कोषाध्यक्ष केशव कुचनकार व सदस्य म्हणुन चंद्रकांत पोतराजे, गणपत वरारकर, अनिल वरारकर, मनोहर गोहणे, सुर्यकांत वरारकर, देवराव घोडे, प्रविण आसुटकर यांचा समावेश आहे.
Previous Post Next Post