टॉप बातम्या

विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील नांदेपेरा ते वणी मार्गांवरील नांदेपेरा चौफुली वर २१ डिसेंबर रोजी दुपारी दीड च्या सुमारास विना परवाना वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण परिसरातून तसेच नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होऊनही महसूल विभाग किरकोळ कारवाई करत आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरूच आहे. याबाबतची माहिती वणी पोलिस प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे नांदेपेरा चौफुली वर ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असताना ताब्यात घेतला.

ट्रॅक्टर क्रमांक एमएच २९ सि बि ८३१६ हा ट्रॉलीसह जप्त केला असून पोलीस स्टेशन आवारात जमा केला आहे. आराेपी ट्रॅक्टर चालक गणेश नंदकिशोर गोहोकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Previous Post Next Post