Page

वणी हास्य कलावंतांनी केले हसून हसून लोटपोट!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात सांस्कृतिक वारसा जपत नाट्यकलावंत तथा सागर झेप चे अध्यक्ष सागर मुने यांनी 2013 पासून शहरातील नवनवीन कलावंतांना नाट्य शिबिरद्वारे कलावंत तयार करून राज्य नाट्य स्पर्धा, कामगार स्पर्धा, महिला स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा मध्ये कार्य करून वणी शहरातील सांस्कृतिक वारसा चालवत आहे. येथीलच काही वर्षांपूर्वी नाट्यक्षेत्राकडे स्थानिक कलावंत माघारली होती. मात्र,सागर मुनेंनी त्यांना पुन्हा या नाट्यक्षेत्राकडे ओढ निर्माण करून त्यांना मंच देत आहेत.

मागील तीन वर्षापासून सतत हास्य जत्रा चे कार्यक्रम करत असून वणी शहरातील श्री समर्थ मराठा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व देशमुख वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे दिनांक 13 व दिनांक 14 सप्टेंबरला येथील नागरिकांना हसून हसून लोटपोट केले. 

डॉ. अलोणे यांनी जेष्ठ नाट्य कलावंत अशोक सोनटक्के व अध्यक्ष सागर मुने यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. अशोक सोनटक्के, प्रवीण सातपुते, संदीप कुरकुडे, गौरव नायनवार, चंचल मडावी, अमोल खडसे, उमाकांत म्हसे, शैलेश अडपवार, सीमा सोनटक्के, मीना वानखेडे, प्रिया कोणप्रतिवार, रजनी गारघाटे, यांनी शिकारी अजबराव, शेतीचा नवरा, गावातील शाळा, गुपचुप वाला लखपती, फसवणारा सासरा, या लघुनाटिका सादर करून प्रेक्षकांना खदखदून हसायला भाग पाडले,हे विशेष...