सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ येथे गणपती बप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरयाच्या नामघोषात उत्साही वातावरणात शनिवारी (ता.7) 'श्री' ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
येथील अष्टविनायक गणेश मंडळाची मागील 30 वर्षापासून 'एक गाव एक गणपती' परंपरा आहे. तब्बल दहा दिवस चालणाऱ्या येथील गणेश उत्सवाला सुरुवात झालेली असून यामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.!
'एक गाव, एक गणपती' हा विधायक उपक्रम येथील अष्टविनायक गणेश मंडळ राबवत आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. यंदाही असणार आहे.
तालुक्यात गणेश मंडळांच्या संख्येत व दमदार परंपरेत घट होत असताना अष्टविनायक गणेश मंडळाने मात्र, आपला लौकिक कायम ठेवत यंदा मंडळाने चारधाम पैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचा भव्य व आकर्षक देखावा असलेली श्रीं ची प्रतिष्ठापना केली आहे.
अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अनिकेत झाडे, उपाध्यक्ष अतुल पचारे, सचिव वैभव सोनटक्के, संजय मोहरे सह सचिव, सदस्य सुजीत भेदूरकर, आतिश कवाडे, शेखर राऊत, सुहास दानव, सुमित दानव, विकास दानव, विलास कोल्हे, गणेश क्षीरसागर, मोहम्मद खां पठाण, वासुदेव विखणकर, चंद्रकांत उरकुडे, प्रकाश मांढरे, स्वप्नील लडके, शुभम पालकर पदाधिकाऱ्यांनी येथील "श्रीं" ची प्रतिष्ठापना पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचे सांगितले.