सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
राळेगाव : १५ ऑगष्ट रोजी भाऊसाहेब कोल्हे सभागृहात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन मा.अशोकराव मेश्राम मित्र परिवाराच्या वतीने माजी सैनिक सन्मान, पंढरपूर वारी दिंडीकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रफुल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, उद्घाटक मा.अंनत लक्ष्मणराव वाट. माजी सैनिक, तर प्रमुख पाहुणे मा.सुधिर पाटील.उपविभागीय अधिकारी राळेगाव,मा.अमित भोईटे तहसीलदार राळेगाव, मा.सुधिर पाटील जवादे, अ.भा.सरपंच परिषद, मा.अशोकराव मेश्राम मा.वरीष्ट पोलिस अधीकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
विशेष म्हणजे सोहळ्या प्रसंगी देशभक्ती गीत व फिल्मी गीतांचा नजराना संगम ऑर्केस्ट्रा अमरावती व्दारा प्रस्तुत 'ऐ वतन तेरे लिये' या देशभक्ती कार्यक्रमाचे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राळेगाव विधानसभा क्षेत्रातील देशप्रेमी, बंधु भगीनिंनो मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अशोक मेश्राम मा.वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी केले आहे.