शेतकरी न्याय यात्रेला झरी तालुक्यात प्रचंड प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

झरी : शेतकरी, शेतमजूर, युवक बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रात आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग अध्यक्ष झरी तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संकल्पनेतून 'शेतकरी न्याय यात्रे'चे आयोजन खासदार प्रतिभा धानोरकर माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात करण्यात आले. मारेगाव सह झरी तालुक्यात न्याय यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

राज्य सरकारने व स्थानिक लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल केली त्याची पोलखोल करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ही न्यायात्रा काढण्यात आली आहे. असे यात्रेचे संयोजक आशिष खुलसंगे यांनी सांगितले आहे. मारेगाव तालुक्यातून यात्रेची सुरुवात होऊन झरी तालुक्यातील गावा गावात पोहचली. दरम्यान न्यायात्रेचे पुष्प गुच्छ देऊन व औक्षवंत करून ढोल ताशाच्या गजरात नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.  

गावागावातील लोकं आपल्या गावातील समस्यांची निवेदने यात्रेचे संयोजक आशिष खुलसंगे यांचे कडे देत आहे. झरी तालुक्यातील मुकुटबन येथे शेतकरी न्याय यात्रा पोहोचली असता या न्याय यात्रेत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती 
प्रतिभा धानोरकर ह्या सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. 

विशेष म्हणजे यात्रेचे संयोजक आशिष खुलसंगे यांनी लोकप्रतिनिधीनी केलेल्या विकास कामांची पोलखोल सुरू केली आहे, रस्त्यावर खड्डा नसलेल गाव दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा असे, आवाहन खुलसंगे यांनी यावेळी केले आहे. त्यामुळे वणी विधानसभा मतदार संघात विकास कामांची चांगलीच पोलखोल व चर्चा होत आहे. शेतकरी न्याय यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या यात्रेचा शुभारंभ विदर्भासह मारेगाव तालुक्याचे आराध्य दैवत जानामाय-कासामाय देवस्थान वनोजा-देवी येथून करण्यात आले होते. 
Previous Post Next Post