टॉप बातम्या

वणीत दहीहंडी चा थरार: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

वणी : दहीहंडीचा उत्सव म्हटलं की मुंबई आणि ठाण्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हे आपण ऐकलंच आहे. पणमात्र, विदर्भात तरी प्रत्यक्षात खूप कमी बघितलं जात म्हणायला हरकत नाही. मात्र, तेच आता प्रत्यक्ष बघण्यासाठी तयार रहा, कारण मनसे घेऊन येत आहे, सर्वात उंच अशी दहीहंडी उत्सव. उद्या शुक्रवारी 30 ऑगस्ट ला सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

वणी शहरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. हे मागील वर्षीपासून आपण कुतूहलाने पाहत आहोत. यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्वावर मनसे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडी उत्सव साजरी करण्यात येत आहे. या मनसे दहीहंडी उत्सवाची जय्यत झाली असून उद्या (ता.30) रोजी या उंच अशी दहीहंडी चा थरार वणीकरांना थेट अनुभवायला मिळणार आहे. या उत्सवात मराठी सिनेअभिनेत्री माधुरी पवार ही देखील उपस्थित असणार आहे. त्यामुळे ही 'दहीहंडी' आणखीनच शिगेला पोहचली आहे. 

शासकीय मैदान येथील भव्य पटांगणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून हा उत्सव साजरा होणार आहे. विशेष म्हणजे माधुरी पवार या सिनेअभिनेत्रीला दहीहंडी उत्सवाकरिता मनसे कडून खास आमंत्रित करण्यात आले आहे. दिलखेचक दहीहंडी स्पर्धेत भाग घेण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोविंदा पथकं वणीत दाखल होणार आहेत. 

मुंबई, ठाण्याप्रमाणे विदर्भातील वणी येथे उद्या होणाऱ्या सर्वात उंच अशी दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवण्याकरिता व हर्षउल्हासाच्या वातावरणात सहभागी होण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.
Previous Post Next Post