लोकांना विरोधकांच्या खोट्या प्रचारापासून सावध करायचा आहे - संजीव रेड्डी बोदकुरवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 10 ऑगस्ट रोजी एस.बी.लॉन वणी येथे भारतीय जनता पार्टी वणीच्या वतीने वणी विधासभा क्षेत्रातील शहर व ग्रामीण अधिवेशन आयोजित करण्यात आले. 

अधिवेशनात ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवर, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून ध्वजारोहणाने उद्घाटन केले,त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी पूर्ण बहुमत मिळून देत सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याचा ऐतिहासिक यशाबद्दल "अभिनंदन ठराव" मांडण्यात आला. 

या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागेव असे आवाहन ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केले. तर कार्यक्रमाला संबोधित करताना वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी सांगितलं की, विरोधकांनी संविधान बदलवणार, एस.सी/एस.टी चे आरक्षण संपवणार असा खोटा अपप्रचार करून लोकांना भ्रमीत केलं, त्यामुळे आपण कुठे तरी कमी पडलोय, मात्र जनतेला खोट्या प्रचारापासून सावध करण्यासाठी त्यांच्या पर्यंत पोहचायचं आहे असेही ते म्हणाले. वणी येथील भाजपाद्वारा आयोजित वणी शहर व ग्रामीण अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.

याप्रसंगी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे सह अन्य मान्यवर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post