कोसारा येथील ४७ ‘भोई’ कुटुंबांना घरकुल निधीची प्रतीक्षा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : ‘यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल' योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार कोसारा येथील वैयक्तिक लाभार्थ्यांना निधी देण्यात यावा अशी मागणी उपसरपंच सचिन पचारे यांनी मंत्रालयात भेट घेत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना केली आहे. 

तालुक्यातील कोसारा येथील ४७ भोई समाजातील पात्र कुटुंबांचा योजनेत समावेश असून त्यांना मान्यता सुद्धा देण्यात आली आहे, मात्र, आतापर्यंत निधीच मिळाला नसल्याने येथील मंजूर लाभार्थी घरकुल बांधकामापासून वंचित आहे, ही खेदाची बाब असल्याचे लाभार्राथ्यातून बोलल्या जातेय.

निवेदनात पुढे असंही म्हटलं आहे की,कोसारा मासे मारी करणारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. १९७९ च्या महापुरामुळे हे गाव वाहून गेले होते आणि पुनर्वसन असल्या कारणाने मासेमारी करणाऱ्या समाजाला कुठल्याही योजने मधून घरे आजतागायत मिळाली नाही. पण आता सर्व कागद पत्राची पूर्तता केल्यामुळे दिनाक ०७४/१२/२०२३ रोजी जिल्हा समिती च्या सभेत मान्यता देण्यात आली आहे.घरकुल लाभार्थी करिता निधीची मागणी शासनास करण्याबाबत जिल्हा समिती च्या सभेत मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे कोसारा येथील वैयक्तिक लाभार्थ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे वणी विधानसभा अध्यक्ष तथा उपसरपंच सचिन पचारे व राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, व अतुल पचारे हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post