सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन व कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मार्डी येथे आरोग्य व मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया वणी मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या संकल्पनेतून दि.४ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते.
या आयोजित शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले असून, यासोबतच ४० नेत्ररूग्णांवर सेवाग्राम येथे मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर आज मंगळवार दिनांक १६ जुलै ला मार्डी येथील महादेव मंदिर मध्ये उपस्थित ४२५ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. जर कोणाला या शिबिराचा लाभ घेता आला नसेल त्यांनी वणी येथील होणाऱ्या शिबिराचा लाभ घ्या अशी मान्यवरांनी माहिती दिली.
यावेळी श्री.विशाल दूधबळे बजरंग दल जिल्हा संयोजक, वणी, भाजपा निमंत्रक सदस्य श्री.मंगेश देशपांडे, भाजपा कार्यकर्ते श्री. सुधाकर बोबडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय खिरटकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
विधानसभा क्षेत्रासह मार्डी परिसरातील शेकडो रुग्णांना दृष्टी दिली,शिबिराचे संयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व चोरडिया हॉस्पिटल, वणी यांनी केले होते.