Top News

मोहदा येथील स्मशानभूमीत नवीन डिपी सह विद्युत पुरवठा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील मोहदा येथील स्मशानभूमी मध्ये मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात आली होती. मात्र, पाण्याची व्यवस्था नसल्याने ती लागवड केलेली झाडे ऱ्हास होऊ लागल्याने येथील ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समिती कडे स्मशानभूमीत नवीन डिपी सह विद्युत पुरवठा व लाईट ची व्यवस्था देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला यश आल्याचे मोहदा ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष उपसरपंच सचिन रासेकर यांनी सांगितले आहे. 

मोहदा उपसरपंचश्री. रासेकर यांनी प्रसूत प्रतिनिधीशी संवाद साधताना सांगितले की, झाडे जगली तरच गावाचे आरोग्य, पर्यावरण संतुलित राहणार आहे. खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकांनी मनापासून सहभाग दर्शवीला आहे. आता झाडे लावली तरी प्रत्येक झाडाला जगविणे हे आमचे परम कर्तव्य असल्यामुळे त्याला पाण्याची व्यवस्था ही अत्यंत महत्वाची होती. गावातील स्मशानभूमी येथे मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु विज पुरवठा नसल्यामुळे झाडांची ऱ्हास होण्याच्या मार्गांवर होती. त्यामुळे स्मशानभूमी जवळ ट्रान्सफार्मर मंजुर करुन त्वरीत स्मशानभूमीला विज पुरवठा देण्यात यावी अशी निवेदनातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कडे 11/5/2022 रोजी आग्रही विनती करण्यात आली होती, त्या विनंती मागणीची दखल घेण्यात आली असून मागील चार दिवसापासून नवीन डिपी सह विद्युत पुरवठा, लाईट ची व्यवस्था काम सुरू करून आज 2024 रोजी पुर्ण झाले आहे.

मोहदा ग्रामपंचायत स्मशानभूमी जवळ ई-क्लास, 4 ते 5 एकर जागा आहेत.त्या जागेला तार कंपाउंड, बोअर सुद्धा आहेत. तिथे मोठया संख्येने वृक्षारोपण, बाबू लागवड करायची असल्यामुळे तिथे विद्युत पुरवठा असणे खूप गरजेचे असल्यामुळे आमदार साहेब यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत मोहदा येथील स्म्शान भूमीमध्ये नवीन डीपी कनेक्शन मिळाले. असे मत विद्यमान सरपंचा सौ वर्षा रवींद्र राजूरकर यांनी व्यक्त केलं. वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, नवीन अग्रवाल स्टोन क्रेशर यांची मोठी मदत मिळाली,त्यामुळे त्या सर्वांचे व प्रशासनाचे गावाच्या व ग्रामपंचायत मोहदा च्या वतीने आभार मानले.
Previous Post Next Post