मारेगावचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची वाशिम येथे बदली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांची बदली झाली असून, त्यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे तालुका वासियांचे आता लक्ष लागले आहे.

अमरावती पोलीस महानिरीक्ष कार्यालय अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच  करण्यात आली आहे. मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची काल रात्री यांच्या बदलीचे आदेश निघाले.

लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने मा. केंद्रीय निवडणुक आयोग, मा. मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांनी संदर्भीय निर्देशानुसार आणि निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अमरावती परीक्षेत्रांतर्गत सहा. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेणेकामी दि.२४/०२/२०२४ रोजी परीक्षेत्रीय आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकित महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ मधील कलम-२२ न, पोट कलम (२) अन्वये परीक्षेत्र स्तरावतील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती परीक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळ यांनी सहा. पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे. त्यामुळे मारेगाव पोलीस ठाण्यात नवा गडी नवा राज सुरू होणार आहे.

विशेष उल्लेखनीय की, निष्क्रिय ठाणेदाराची बदली करिता सामाजिक,राजकीय लोकांची आग्रही मागणी होती. तालुक्यात मटका, जुगार, कोंबड बाजार, अवैध दारू, अवैध कोल डेपो, रेती तक्सरी यासह कौटुंबिक तंटे जसे च्या तसे असल्याचे नागरिकांनी अनुभवले त्यामुळे त्यांची बदली व्हावी अशी आग्रही मागणी होती. किंबहुना त्यांची या अगोदर बदली होणार होती असे समजते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे बदली थांबल्याचे बोलल्या जात असताना अखेर ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची 24/02/2024 रोजी बदलीचे आदेश धडकले आणि त्यांची वाशिम येथे बदली झाल्याचा आदेश जिल्हा पोलीस यवतमाळ कार्यालय यांना धडकला.

संबंधीत घटक प्रमुखांनी या बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तत्काळ बजावुन त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे. बदली झालेल्या पोलीस अधिका-यांना कार्यमुक्त करतांना पर्यायी/बदलीवर येणा-या पोलीस अधिका-यांची वाट पाहु नये. तसेच भारतीय निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटोकोरणे पालन करावे, कोणत्याही घटकात निवडणुकिची प्रक्रीया किंवा त्या अनुषंगाने आचार संहिता सुरु असल्यास घटक प्रमुखांनी संबंधीत निवडणूक अधिका-यांशी संपर्क साधून आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेवुन संबंधीत अधिका-यास कार्यमुक्त करावे व तसा अनुपालन अहवाल सादर करावा असं पत्रात म्हटलं आहे.

नमुद बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता रुग्णनिवेदन करतील किंवा गैरहजर रहातील ते पोलीस अधिकारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील याबाबतची समज त्यांना दयावी आणि भारतीय निवडणुक आयोगाने निर्धारीत केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्या जाईल, कोणत्याही प्रकारचे उल्लंघण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश पत्रात नमूद आहे. 
Previous Post Next Post