महसूल पथकांनी रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यात रेती तस्करीचा उच्छाद मांडलेल्या महादापेठ येथील जेसीबी मशीन सह चिंचमंडळ येथील ट्रॅक्टर चालकाच्या मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी मुसक्या आवळत एक ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त केले. ही कारवाई आज (ता.26 फेब्रु.) सोमवारच्या मध्यरात्री 2.49 वाजताचे दरम्यान,केल्याने परिसरातील तस्करांचे पुरते धाबे दणाणले आहे.

तालुक्यातील कोसारा घाटावरील रेती तस्करी हा पाठशिवणीचा खेळ नित्याचाच आहे. यात चिंचमंडळ रेती तस्कर नियमित आपला रात्रीचा डाव चालवित शासनाच्या महसूलला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा गोरखधंदा सर्वश्रुत आहे. मात्र कारवाईचा फास आवळण्यात प्रशासन नापास यापूर्वी होतांना दिसत होते. दरम्यान, तस्करांचा पर्दाफाश करण्यासाठी प्रशासकीय सेवेतील पारदर्शक अधिकारी तहसीलदार उत्तम निलावाड यांनी रात्रीचा खेळ उध्वस्त करण्यासाठी व्युव्हरचना आखत मध्यरात्री 2.49 वाजता जेसीबी मशीनने रेती उपसा करित असताना एक ट्रॅक्टर आणि जेसीबी वर कारवाईचा फास आवळत जप्त केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे तालुक्यात रेती तस्करीचा बोलबाला असलेल्या परिसरातील तस्करांना लगाम लावण्यासाठी महसूल विभाग एक्शन मोड वर येवून तहसीलदार सह पथकाने रात्रभर शिवारात ठाण मांडत चिंचमंडळ येथील वाळू भरलेले एक ट्रॅक्टर आणि महादापेठ येथील जेसीबी वर छापा टाकून वाहन जप्त केले.
तहसीलदार निलावाड यांच्या पारदर्शक भूमिकेने तालुक्यात बहुदा पहिल्यांदाच एखाद्या अधिकाऱ्याने रेती तस्करांवर थेट आणि प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारल्याने चांगलाच चाप बसणार आहे. शासनाकडून रेती घाट उपसा व लिलाव प्रक्रीयेला तूर्तास फुलस्टॉप असतांना तस्करांचे चांगलेच फावत आहे. तहसीलदार यांच्या धडाकेबाज कारवाईने तस्करांनी चांगलाच धसका घेतला असून आपण कारवाईचा बडगा कायम ठेवून तस्करांवर लगाम लावण्याचा आशावाद तहसीलदार उत्तम निलावाड यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना व्यक्त केला.

सदरची कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, तलाठी विवेश सोयाम, तलाठी विकास मडावी, तलाठी एस सी कुडमेथे, ड्रायव्हर विजय कनाके, शिपाई वेले यांनी केली.
Previous Post Next Post