टॉप बातम्या

आठ महिन्यापासून पोलिसांच्या हातावर तुरी देणारा फरार 'आजम' अखेर अटकेत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : गेल्या 8 महिन्यापासून पोलिसांना सतत गुंगारा देऊन फरार असलेल्या आरोपीच्या वणी पोलिसांनी अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथून मोठ्या सीताफिने अटक केली आहे.

सोमवार ला महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त साजरी होत असताना वणी पोलीस दलाचे जवान शहरातील बंदोबस्तात होते. जयंती चा बंदोबस्त आटोपून पोलीस पथक दुर्गापूर (चंद्रपूर) च्या दिशेने तत्काळ रवाना झाले. आठ महिन्यापासून फरार असलेला आरोपी आजम शेख बाबा शेख (27) रा. वार्ड क्र. 3 यास ताब्यात घेतले. बाबा शेखवर 11 जुलै 2023 ला अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार,तसेच अनु.जाती,जमाती कायदा व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर आठ महिन्यांनी वणी पोलिसांनी दुर्गापूर पोलिसांच्या मदतीने आरोपी आजम शेख बाबा शेख ला अटक केली.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी, सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक झोडेकर, विजय वानखडे, शुभम सोनूले, गजानन कुळमेथे आदींनी केली आहे.
Previous Post Next Post