टॉप बातम्या

व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे : उत्तम निलावाड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9.30 वाजता मारेगाव येथील तहसील कार्यालयात मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमास तहसील कार्यालयाचे कर्मचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. ते म्हणाले की, अमली पदार्थांचे व्यसन ही समाजातील मोठी समस्या आहे. व्यसनमुक्तीसाठी सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील. शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, डोल ताशासह मिरवणूक काढून ध्वजारोहण केले.

तहसील कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रजासत्ताक दीन साजरा केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व गाणी सादर केली. तहसीलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व गाणी सादर केली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तहसील कार्यालयाचे कर्मचारी, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ व इतर मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
Previous Post Next Post