Page

आश्रम शाळा आष्टी यांनी सादर केलेल्या प्रयोगाची राज्यस्तरावर निवड

सह्याद्री चौफेर | रूस्तम शेख

कळंब : एन.सी., ई. आर.टी. नवी दिल्ली भारत सरकार व विद्या प्राधिकरण द्वारा पुरस्कृत शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाडगाव (ता.राळेगाव) येथे आयोजित करण्यात आले.          
या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा आष्टी यांनी सादर केलेल्या 'भारतीय सीमेचे लेझर द्वारा संरक्षण' या प्रयोगास प्रथम क्रमांक प्राप्त झाला असुन या प्रयोगाची राज्य स्तरावर निवड करण्यात आली. 
या प्रसंगी आमदार बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैना घोष,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र तसेच मानक चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले.