Top News

वर्दळीच्या भर चौकात होणाऱ्या थेट प्रक्षेपणाला परवानगी नाकारावी - युवासेनेचे पोलिसांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : रविवार दि.19 तारखेला विश्वचषक सामन्याचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र, हा सामना घरोघरी, मोबाईल आणि टीव्ही वर दिसत असल्यामुळे भर चौकात इलेक्ट्रॉनिक उपकरण लावून दाखवण्याची गरज कशासाठी? पोलीस आणि नगरपरिषद ने परवानगी नाकारावी अशा आशयाचे निवेदन दि. 17 नोव्हेंबर रोजी युवासेने च्या वतीने पोलिसात देण्यात आले.
रविवारी भारत विरुद्ध आस्ट्रेलिया चा सामना उद्या होणार आहे, त्यासाठी वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या सामन्याचे थेट प्रेक्षपण मोठ्‌या एलईडी टिव्हीवर दाखविण्यात येणार आहे. असे विविध संघटनानी जाहीर सुद्धा केले. आणि निश्चितच हा होणारा सामना वणीकरासाठी नाहीतर देशासाठी जल्लोष, आनंदाचा असणार आहे. परंतु दरम्यान, वणी शहरातील हा टिळक चौक अत्यंत रहदारीचा आहे. सामना सुरू झाल्यानंतर या चौकात क्रिकेट प्रेमिंची संख्या वाढणार आणि याचा फटका वाहतुकीला होणार आहे. असे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
साहजिकच ज्यामुळे जनतेची गैरसोय होणार यात शंका नाही. रविवार बाजार दिवस असल्याने या बाजारात आलेल्या लोकांची या सामन्याने चांगलीच गैरसोय होणार. शिवाय वणी वरोरा रोडचे काम सुरु आहे तसेच एकता नगर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने जनतेची या रस्त्यावरून वाहतूक होणार नाही. अशी सद्य स्थिती असताना प्रशासनाने या राजकीय पुढाऱ्यांना थेट प्रेक्षपण दाखविण्याची परवानगी कशी दिली असा थेट सवाल संबंधित दोन्ही विभागाला श्री शेंडे यांनी केला आहे.
पुढे असेही ते म्हणाले की, या राजकीय पुढाऱ्यांना जर असे कार्यक्रम घ्यायचे असल्यास त्यांनी आपल्या स्वमालकीच्या जागेत घ्यावे. सार्वजनिक जागेत व रस्त्यावर घेवू नये. यादरम्यान प्रेक्षणात कर्कश आवाजात डिजे सुद्धा वाजणार असल्याचीही माहिती आहे. ज्यामुळे ध्वनिप्रदूषण होणार आहे, ही देण्यात आलेली परवानगी त्वरित नाकारण्यात यावी, अन्यथा याच चौकात युवासेना शेकडो कार्यकर्त्यासह आंदोलन करणार असा गर्भीत इशाराही युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून दिला आहे. आता या मागणीला कितपत यश येतं याकडे सर्व तालुका वासियांचे लक्ष वेधले आहेत.
Previous Post Next Post