सदैव सर्वतोपरी सहकार्यास कृषी उत्पन्न बाजार समिती तत्पर आहे - सभापती गौरीशंकर खुराणा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : शेती ते बाजारपेठ असे आश्‍वासक पाऊल महिला शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडने टाकले आहे. हा उपक्रम विदर्भात नावीन्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन करत,सदैव सर्वतोपरी सहकार्य करण्यास कृषी उत्पन्न बाजार समिती तत्पर आहे, अशी कृ उ बा समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांनी आयोजित कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माहिती दिली.
मंगरूळ येथील उपविभागीय कार्यालयात दि.6 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक अर्चना मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे प्रमुख पाहुणे कृ.उ.बा.समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, युवा उद्योजक तथा सरपंच श्री जगदीश ठेंगणे (मंगरूळ), मारेगाव पं स माजी सभापती शितल पोटे, जिल्हा अभियान कशाचे एफपीओ (FPO) समन्वयक श्री वैभव कुंड्रॉवार, कंपनीचे सीईओ (CEO) श्री महेश पाचपोहर, तालुका अभियान कक्षाचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री विठ्ठल आत्राम, तालुका व्यवस्थापक श्री सुधीर टाले, तालुका व्यवस्थापक श्री अक्षय काकडे, तालुका व्यवस्थापक सौ कविता गायकवाड, पशु व्यवस्थापक श्री. प्रफुल शंभरकर, कंपनीचे लेखापाल श्री. सागर मडावी, उपस्थित होते.
या प्रसंगी युवा उद्योजक जगदीश ठेंगणे यांनी कंपनीची खरेदी ही पारदर्शकता स्वरूपाची असून, बऱ्याच कुटुंबाला याचा फायदा होतील अशा स्वरूपात मार्गदर्शन केले. माजी सभापती सौ. शितल पोटे यांनी महिला ह्या बियाणे निर्मिती प्रकल्पात प्रथमच काम करत असून, त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर तालुका अभियान व्यवस्थापक आत्राम, यांनी जास्तीत जास्त भागधारक वाढवा व त्यातून कंपनीच्या सर्व सोयीसुविधा आपल्याला उपलब्ध होतील अशी माहिती दिली. एफपीओ समन्वयक वैभव कुंड्रॉवार यांनी कंपनी मध्ये भागधारकाचे शेअर्स कसे वाढतात व त्यानुसार काय काय नियोजन असेल, या बाबत सविस्तर माहिती दिली. तर टाले सर यांनी कंपनीची कार्यप्रणाली ही उत्कृष्ठरित्या असून, भविष्यात या कंपनीला वाव येतील त्याबद्दल मार्गदर्शन केले.
कंपनीचे CEO महेश पाचपोहर यांनी कंपनीची प्रास्ताविक केले, व त्यात भाग धारकांना भविष्यकालीन करावयाच्या सर्व उपक्रमाबद्दल माहिती देऊन कंपनी गोडाऊनला भेट देत प्रत्येक मशीन व त्याच्या कार्याबद्दल सविस्तर वर्णन करत त्याचा प्रत्यक्षपणे लाभार्थ्यांना होणारा फायदा याबाबत भूमिका विषद केली.      
दरम्यान, कंपनी मध्ये शेतमाल खरेदी करत असताना ऑनलाईन पोर्टलची संपूर्ण माहिती कुमुद बोधे यांनी दिली. शेतमाल खरेदी करित असताना त्या प्रती पारदर्शकता कशी असते,या विषयी अनिता लाडसे यांनी माहिती दिली, तर कंपनी डायरेक्टर सोनूले ताई यांनी कंपनी मधील भागधारकाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन डायरेक्टर सौ. प्रियंका देवाळकर यांनी, तर आभार प्रदर्शन रेखा बदखल यांनी केले.

यावेळी कंपनीचे सर्व डायरेक्ट, समन्वयक, उपस्थित सर्व भागधारक यांच्या उपस्थिती ही वार्षिक सर्वसाधारण सभा आज पाडली.