Page

समाजकल्याण उपायुक्त डॉ.सचिन शंकरराव मडावी यांना मातृशोक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि.30 ऑक्टोबर 2023 रोज सोमवार ला पहाटे 5 वाजता सौ रत्नमाला शंकरराव मडावी यांचे निधन झाले, त्या माजी नायबतहसीलदार तथा स्वीकृत नगरसेवक श्री. शंकरराव मडावी यांच्या पत्नी सौ.रत्नमाला शंकर मडावी ह्या पत्नी होत, तर समाजकल्याण उपायुक्त डॉ सचिन मडावी (गडचिरोली) यांच्या मातोश्री होत्या.

गेल्या महिन्याभऱ्यापासून त्यांचे वर उपचार सुरु होते. आज पहाटे गडचिरोली येथील हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले.

त्यांचा पश्चात पती, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3.00 वाजता मारेगांव येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे.