सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ मात्र पोळ्याच्या एक दिवसा अगोदर निज श्रावणात वाड बैला च्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या बैलाचे खांद शेकतात. याच दिवशी आपल्या आप्तेष्टासह बैलांना घरी गोड धोड करुण खाऊ घालतात.
यावेळी बैलांच्या सदृढ आरोग्यासाठी महादेव भोले शंकराला साकडे घातले जाते. आजच्या दिवसाला मोठ्या भक्तीने भावाने बैलांचे खांद शेकत पूजन करून त्यांना नमस्कार केला जातो. तेव्हा शेतकरी म्हणतो 'अज आवतन घ्या, उद्या जेवाले या'... अज आवतन घ्या, उद्या जेवाले या'... अज आवतन घ्या, उद्या जेवाले या'... अज आवतन घ्या, उद्या जेवाले या' एक मन कवळा पारबती हरभरा हर हर महादेव...
समस्त शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना "सह्याद्री चौफेर" ई पेपर मिडिया प्लॅटफॉर्म तर्फे आजपासून सुरु होणाऱ्या वाडबैल, पोळा आणि तान्हा पोळ्या च्या खूप खूप शुभेच्छा!