सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर
मारेगाव : आज बडग्याच्या निमित्ताने कान्हाळगांव येथे तान्हा पोळा बालगोपालांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. अध्यक्षस्थानी श्री.संजय श्रावण येरमे (सरपंच) ग्रा. प कान्हाळगाव यांचे हस्ते बाळगोपाळाना चित्रकला वही पेन्सिल व रांगकांडी देण्यात आली. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. सूर्यकांत चिकटे यांच्या हस्ते रोख बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी गावातील नागरिक श्री राजुभाऊ चिकटे, विठ्ठल शेंडे, बंडू आत्राम, सौ.ममता रवि वनकर ग्राम पं सदस्य, भारत मडावी, गणेश नैताम, बंडू चिकटे, हर्षद चिकटे, विजुभाऊ बदखल, प्रफुल्ल चिकटे, रुपेश बदखल, मारोती शेंडे, सूरज शेंडे, विपीन चिकटे, महेंद्र चिकटे, महादेव ठावरी, प्रदीप वनकर, रवि वनकर, अनिल येरमे, दिनेश कामाटकर, रविंद्र मडावी, दिलीप बदखल, भास्कर येरमे, सुधाकर बदखल यांनी खुप मोलाचे सहकार्य व योगदान दिले.