Page

कानडा येथे पोळा उत्सहात पार पडला

सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर

मारेगाव : शेतकऱ्यांसह सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळा. या सणानिमित्त कानडा येथे मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात आला.

मारेगाव तालुक्यातील कानडा येथे पोळा गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात साजरा केला. दरवर्षीप्रमाणे पोळ्याला हर्रास करण्यात येतो, या वर्षीचा जोडीचा काढण्याचा मान प्रगतिशील शेतकरी उत्तम येवले व तोरणमाळ तोडण्याचा मान प्रगतिशील शेतकरी स्वप्नील चिडे यांना मिळाला. त्याबद्दल त्यांचा बळीराजाच्या वतीने सन्मान करुण अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पवन ढवस, विनोद धोबे, रामचंद्र येवले, प्रकाश डाहुले, प्रशांत चवले, पुंडलिक राजूरकर, सतीश ढोके, रुपेश ढोके, यांचे मोलाचे श्रेय लाभले. या उत्सवात समस्त कानडा ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगी येथे आगळा वेगळ्या पद्धतीने तान्हा पोळा केला साजरा:

मारेगाव तालुक्यात मोठ्या उत्सहात तान्हा पोळा साजरा होत असताना आज मंगी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या  आगळा वेगळ्या पद्धतीने तान्हा पोळा साजरा करण्यात आला.

यावेळी गावातील बाळगोपालांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तान्हा पोळा साजरा केला. दरम्यान,स्वराज्य ग्रुप तर्फे शालेय पेन व रजिस्टर बाल गोपालांना दिले तर गावाकऱ्यांनी त्यांना खाऊचे वाटप केले. हा तान्हा पोळा गेल्या चार वर्षांपासून शांततापूर्ण व आनंदात साजरा करण्यात येतो असे, गावातील नागरिकांनी सांगितले.