सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
शहरातील माधव नगरी व अन्य प्रभागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी हातसाफ केला आहे. यात अंदाजे दहा ते पंधरा घरफोडी झाल्याचे चर्चा असून काही ठिकाणी संबंधित प्रशासन दाखल होऊन कारवाई सुरु आहे. मात्र या घरफोडी मध्ये नेमकं काय चोरीला गेले हे सध्या तरी सांगता येणार नाही मात्र, घरफोडी मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजते.
काल शहरात सर्व पोळ्यात व्यस्त असल्याने तसेच शनिवार रविवार सुट्टी असल्याने काही कर्मचारी गावाकडे जाऊन आपला पोळा सन साजरा करण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी आपला डाव साधला असल्याचे बोलल्या जात आहे. म्हणजे ज्या घरी कुणी हजर नव्हते अशा पैकी घरफोडी झाल्याचे समजते. ही खळबळजनक बाब सकाळी उघडकीस आली. यात सुंदरलाल आत्राम सर, कळंबे सर, डवरे, भोयर, काकडे, बोन्डे, राजगडे, जुमडे, चिंचुलकर, श्रीमती स्वाती आत्राम यांच्या सह अन्य घरी घरफोडी झाल्याचे चर्चा आहे. तूर्तास पोलिसांसमोर मोठे आव्हान असून यासंदर्भात कारवाई सुरु आहे. यात आणखी किती घरफोड्या झाल्या हे पोलीस तपासातून समोर येईल. अंदाजे वीस ते पंचवीस घरावर दरोडा टाकल्याचे चर्चा जोरात आहे.