टॉप बातम्या

घेऊन जा गे...मारबत!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला मारबत काढण्यात येते. काळ्या-पिवळ्या मारबत म्हणजे वाईट परंपरा, अंधश्रद्धा जाळणे. चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत करणे हा यामागचा एक उद्देश आहे. मात्र, हल्ली च्या काळात पळसाचे डाळ दारा समोरे लावून त्याची पूजा अर्चना करुण तान्हा पोळ्या ला पहाटे पासून मारबत काढण्याची प्रथा सुरु आहे. परंतु उपराजधानीत काळी पिवळी पुतळे बनवून मारबत काढण्याची मोठी परंपरा आजही आहे.

विशेष म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी 'मारबत आणि बडग्या' या प्रकारची मिरवणूक जगात फक्त नागपूर, महाराष्ट्रात काढली जाते. ‘घेऊन जा गे.. मारबत’ अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली. इंग्रजांच्या राजवटीत लोक अत्याचार सहन करत होते. त्यावेळी देश स्वतंत्र झाला पाहिजे या भावनेतून मारबत काढली.ही परंपरा मूळ आदिवासींची आहे, जी नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी त्यांच्या दडपशाही आणि अत्याचाराविरुद्ध काळी पिवळी चळवळ सुरू केली.

मारबत उत्सव हा गणेशोत्सवापेक्षा जुना सण म्हणून पाहिला जातो. प्राचीन काळी अनेक प्रथा होत्या. त्या पारंपारिक परंपरा मानवजातीसाठी घातक असल्याने त्या नष्ट करण्यासाठीही हा सण साजरा केला जातो. मारबत सण साजरा करण्यामागे एक उद्देश आहे. म्हणजे वाईट परंपरा आणि अंधश्रद्धा जाळून चांगल्या परंपरा आणि कल्पनांचे स्वागत करणे आहे. घेऊन जा गे.. मारबत; फक्त नागपुरातच साजरा होणारा अनोखा मारबत उत्सव आज मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात ही साजरा करण्यात येतो.

Previous Post Next Post