टॉप बातम्या

श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके यांच्याकडून शुभेच्छा


अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केले असून तालुक्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरात धनधान्याची समृध्दी येईल. समाजात आनंद, उत्साह, भक्ती, चैतन्याचं वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही तालुका कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके यांनी व्यक्त केला आहे.

भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही कार्याध्यक्षांनी केले आहे.
Previous Post Next Post