Top News

मारेगाव: जप्त केलेल्या वाहनांचा आज होणार लिलाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : गुन्हयातील जप्त व बेवारस सात वाहनांचा लिलाव 18 ऑगस्ट आज पोलीस स्टेशन मारेगांव येथे होणार असुन, या लिलावामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे, आवाहन मारेगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जनार्धन खंडेराव यांनी केले आहे.

मारेगांव येथील पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या अपघात व बेवारस सात वाहने जप्त केली होती. या वाहनाबाबत वाहन मालकांनी आतापर्यन्त मालकी हक्क सिध्द केलेला नाही. त्यामुळे 18 ऑगस्ट रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता शासकीय नियमावली नुसार पोलीस ठाण्यामध्ये या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असुन, या लिलावामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे, आवाहन ठाणेदार श्री. जनार्धन खंडेराव यांनी केले आहे.
Previous Post Next Post