टॉप बातम्या

मणिपूर घटनेतील क्रूर,नराधमांना फाशी द्या - जिजाऊ ब्रिगेडची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : गेल्या तीन महिन्यांपासून संवेदनशील बनलेल्या मणिपूर राज्यात मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे. सरकार मूग गिळून गप्प आहे. या संतापजनक वास्तव घटनेचा मारेगाव जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आज २५ जुलै रोजी तीव्र निषेध निवेदनातून करण्यात आला आहे. 
महिलांची विवस्त्र धिंड काढुन अत्यंत क्रूर आणि समाजाला लाजविणाऱ्या या समाज व मानवतेचे मन सुन्न करणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व नराधमांना फाशी ची शिक्षा द्या अशी मागणी मारेगाव जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार निलावाड यांचे मार्फत महामहिम राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केला आहे. 
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा लिनाताई पोटे, सचिव शीतलताई पारखी, प्रज्ञा गाडगे, सारिका कोल्हे, मंगला आंबेकर, अरुणा ठाकरे, सुनीता काळे, रंजना आत्राम, साधना आस्वाले, माया गाडगे, शांता, निखाडे यांचेसह सर्व पदाधिकारी व इतर सामाजिक संघटनाची लक्षनीय उपस्थिती होती.
Previous Post Next Post