सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : ओकिनावा शोरीन रू शोरिनकान असोसियेशन, इंडिया तर्फे बेल्ट ग्रेडेशन परिक्षा गजानन महाराज मंदिर हॉल वणी येथे आयोजित केला होता. बेल्ट ग्रेडेशन परिक्षेत वणी तसेच मारेगांव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, यात बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत मारेगांव येथील विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे सहभाग घेतला.
येलो बेल्ट
यशस्वी दाभाडे, संकेत परचाके, स्वरा किनाके, स्नेहल किनाके, भविका कनाके, सारा केलोडे, रियान केलोडे, प्रेरणा टेकाम यांनी पटकवले.
तसेच ऑरेंज बेल्ट मध्ये यश दाभाडे, चैताली गाडगे, दिप घुमे, रागिणी घुमें, बरीरा कुरेशी, स्वरा गुरनुले यांनी पटकवले.
ग्रिन बेल्ट मध्ये तोहीद कुरेशी यासह सर्वाना बेल्ट प्रदान करण्यात येत आहे. या यशाचे श्रेय हॅन्शी शरद सुकदेवे (8th Dan Black Belt), नागपुर महाराष्ट्र चिफ सिंहान शरद चिकाटे (5th Dan Black Belt), सेन्साई धनंजय त्रेबंके (2nd Dan Black Bet), सेंन्साई नरेश मुरस्कर (2nd Dan Black Belt), सेन्साई प्रा. राजेश घुमे (2nd Dan Black Beit), सेंन्साई शारदा ढक (1st Dan Black Belt), या सगळयांना आपल्या यशाचे श्रेय देते.
ह्या बेल्ट ग्रेडेसन परिक्षेत 31, येलो बेल्ट 12, ऑरेंज बेल्ट 4, ब्लू बेल्ट 4, ग्रिन बेल्ट 6, ब्राउन बेल्ट प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी कराटे कार्येकमांच्या मंचावर डॉ.प्रा.संदीप केलोडे, डॉ. केलोडे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या प्रशिक्षणात ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी माधव नगरी मारेगांव येथे सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षणाला भेट देऊन प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.