टॉप बातम्या

पांदण रस्त्याला ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता द्या-ग्राम पंचायत सदस्य राहुल खारकर यांचे जि प बांधकाम विभागाला निवेदन


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : गाव समृद्ध करण्यासाठी पांदण रस्त्यांचे महत्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या महत्वाएवढे आहे. पाणंद रस्त्याच्या अभावामुळे शेतासह अन्य मालाच्या वाहतूकीला मर्यादा येतात आणि त्यामुळे नागरिकांना शेती सह विविध कामासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. अशीच काही सद्यस्थिती तालुक्यातील गावांची आहे.

लाठी ते भालर वसाहत जाणार पांदण रस्ता हा सरकारी असुन त्याची लांबी 2 किलोमीटर व रुंदी 33 फूट आहे. हा पांदण रस्त्याचे 16 वर्षांपूर्वी वेकोली च्या CSR फंडातून या रोडचे डांबरीकरण झाले होते.परंतु वर्तमान स्थितीत या रोडची चाळण झाली असून,दुर्दशा बघितल्यास "खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे" अशी झाली आहे. करिता रस्त्याचे नूतनीकरण करण्याकरिता या पांदण रस्त्याचे ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा देणे आवश्यक आहे असे राहुल खारकर यांनी निवेदनातून म्हटले आहे.


लाठी-भालर वसाहत संयुक्त ग्रामपंचायत झाल्याला 25 वर्षे जास्त उलटून गेली मात्र 25 वर्षात कोणत्याही लाठी भालर वसाहत येथील सरपंच अथवा राजकीय पुढाऱ्याने याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे रोडची दयनीय अवस्थेला आजपर्यंत झालेले सरपंच व पुढारी असल्याचे प्रतिपादन राहुल खारकर यांनी केले.
Previous Post Next Post