सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
सुमित देविदास राखुंडे (24) रा. नटराज चौक (वणी) असे हातात तलावर घेऊन परिसरात धुमाकूळ घालीत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याचे जवळील धारदार तलवार हस्तगत केले असून त्याचे वर भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राच्या माहितीनुसार सपोनि प्रवीण हिरे हे रात्री शहरात गस्त घालत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. पोलिस शिपाई वसीम व श्रीनिवास यांना सोबत घेऊन शहरात रात्रीची गस्त घालत होते. त्यांना सुचना मिळताच लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली असता,नटराज चौक येथे एक तरुण धारदार तलवार हातात घेऊन धुमाकूळ घालतांना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर, सपोनि प्रवीण हिरे, पो.कॉ. वसिम व श्रीनिवास यांनी केली.