टॉप बातम्या

शिरपूर पोलिस स्टेशनचे जमादार प्रकाश रामदास कुमरे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिरपूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत जमादार प्रकाश रामदास कुमरे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे.

प्रकाश कुमरे यांनी वणी व शिरपूर येथे स्टेशन डायरीत
मागिल १० वर्षा पासुन उत्कृष्ट कामकाज सांभाळले आहे.  सद्यस्थितीत ते शिरपूर पोलिस स्टेशन येथे आपली ड्युटी बजावीत आहे.
शासनाच्या गृहविभागाकडून पोलिस कर्मचारी यांना नुकतेच बढती देण्याचे आदेश पारित झाले आहे. यामध्ये प्रकाश कुमरे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्या नियुक्ती दरम्यान, शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार करेवाड यांनी कुमरे यांचा सन्मान करून त्यांना सन्मानित केले. त्यावेळी संपूर्ण पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post