टॉप बातम्या

नवरगाव येथे सहकारी संस्थे तर्फे सभासदांना खरीप पिक कर्ज वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि.18 मे ला नवरगाव सहकारी संस्था तथा  पेंढरी आदिवासी सहकारी संस्था तर्फे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मा.संजयभाऊ देरकर, उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ, तसेच संचालक कृ. ऊ.बाजार समिती संचालक, गणुजी थेरे तसेच अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट, नवरगाव सोसायटीचे अध्यक्ष संदीप आस्वले, पेंढरी सोसायटीचे अध्यक्ष, दादाराव टेकाम, विभागीय अधिकारी गोहोकर साहेब, निरीक्षक पाचभाई साहेब, व्यवस्थापक येरमे साहेब, सेक्रेटरी जंगेवार साहेब, मारोती सोनुले कर्मचारी.तसेच सर्व संचालक, सभासदांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या प्रसंगी सर्व नवरगाव, हिवरी येथील कर्जदार सभासद हजर होते. यावेळी ऐकूण पीककर्ज 2 कोटी 20 लाख 45 हजार 900 रुपये असे एकूण वाटप करण्यात आला.
Previous Post Next Post