Page

मनमानी फी आकारणाऱ्या शांळाची मान्यता रद्द करा- वंचीत बहुजन आघाडी ची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यात सुरु असलेल्या विना अनुदानित खाजगी इंग्रजी शाळा मध्ये आर्थिक दुर्बल घटका कडून मनमानी फी वसूल केल्या जात आहे. त्यामुळे अशा शाळांची मान्यता रद्द करावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन वंचीत बहुजन आघाडी तालुका शाखा मारेगाव च्या वतीने मारेगाव पंचायत समिती गट शिक्षणाधिकाऱ्याना दिले आहे.

तालुक्यातील मारेगाव तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा मध्ये शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना मनमानी पद्धतीने फी आकारणी केली जात आहे. ही फी विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. शासनाने मागासवर्गीय विदर्थ्यांना 25 टक्के सवलत जाहीर केली असताना सवलत न देता ही पालकाकडून वसूलीचा तगदा लावल्या जात आहे.सन 2022-23 या नव्या शैक्षणिक सत्रा मध्ये प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यां कडून शासनाच्या धोरणा नुसारच फी आकारली जावी या व्यतिरिक्त फी आकारणी करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर तालुका अध्यक्ष गौतम दारुडे, युवा अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष संजय जिवणे, शुभम बिहाडे, गोरखनाथ पाटील, रमेश चिकाटे, वसुमित्र वनकर, सचीन आस्कर, गजू आदेवर, प्रफुल भगत, विश्वास पाटील, गंगाधर तेलंग, शुध्दोधन भालशंकर इत्यादीच्या सह्या आहेत.