डॉक्टर एकनाथ डाखरे यांना पुत्रशोक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रसिद्ध डॉक्टर एकनाथ डाखरे यांचे सुपुत्र तुषार डाखरे (35) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (ता. 25) रात्री 10 वाजता च्या दरम्यान निधन झाले. मनमिळाऊ स्वभावाच्या तुषार यांचे अशा अवेळी जाण्याने डाखरे कुटुंबासह मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.

शहरातील प्र. क्र. 9 येथे डाखरे कुटुंब राहतात. वडील एकनाथ डाखरे हे मारेगाव येथे डॉक्टर असुन, तुषार यांचे मेडिकल स्टोअर्स तथा एका ढाब्याचे संचालक होते. 

काल मंगळवार ला रात्री 10 वा. दरम्यान,ढाब्यावर असताना  त्यांच्या छातीत दुखु लागले. त्यांना उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच तुषार यांचे निधन झाले. 


Previous Post Next Post