सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : गेली पन्नास वर्षे सांस्कृतिक परंपरा जपणारे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. राम शेवाळकर यांच्या संकल्पनेतून निर्मित झालेले वणी येथे 'महामूर्ख संमेलन' या वर्षीही आयोजित करण्यात आलेले आहे.
दरवर्षी होणाऱ्या धुळवडीच्या उत्सवात हास्यरंगाची पेरणी करणारे हे संमेलन असते. कोरोना काळानंतर वणीकरांना हास्यरंगाची धमाल मेजवानी यावर्षी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता एजाज खान, नागपूर तसेच सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित, पुणे हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण राहणार आहे. वणीचे सुप्रसिद्ध नाट्य व हास्य कलावंत प्राचार्य हेमंत चौधरी व वऱ्हाडी कवी पुरुषोत्तम गावंडे हे देखील प्रेक्षकांना मनमुराद हसविणार आहे.
या संमेलनात आजतागायत अनेक नामवंत कलाकारांनी हास्यरंग उधळले आहे. या वर्षी सुद्धा हे संमेलन शेतकरी मंदीर येथे 7 मार्च 2023 रोज मंगळवारला दुपारी 2.00 वाजता संपन्न होणार आहे.
या महामूर्ख संमेलनाला वणी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक मुन्नालाल तुगनायत, शशिकांत माळीचकर, जयचंद खेरा, संजय खाडे, राजेश महाकुलकर, भुमारेड्डी बोदकूरवार, विलन बोदाडकर, गजानन बोढे, सुनील पानघाटे, यांचे तर्फे करण्यात आलेले आहे.