सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील काही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतात जाता यावे, यासाठी विविध नावाने पाणंद रस्त्याची योजना हाती घेण्यात आली. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेचे नाव बदलून मातोश्री ग्रामसमृद्ध शेत पाणंद रस्ते योजना नव्याने हाती घेण्यात आली. मात्र, पाणंद रस्त्यांविना जिल्हाभरातील शेतकऱ्यांची वाट बिकटच बनली आहे. मागील वर्षी पालमंत्र्यांनी आदेश देऊनही बहुतांश गावातील पाणंद रस्त्याची कामे झाली नाही. त्यामुळे यंदा तरी या कामांचा मुहूर्त निघणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांना शेतात जाता यावे, यासाठी पांदण रस्ते आहेत. मात्र, त्याची अवस्था अतिशय बिकट अशी आहे. पाणंद रस्त्यामुळे शेतशिवारा भांडण तंटेही उद्भवताना दिसतात. त्यामुळे ही योजना केवळ कागदोपत्री न ठेवता, प्रत्यक्ष अंमलात आणण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.
मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यात त्रास होतात. पावसाळ्यात भागातील बहुतांश पांदण रस्ते आजपर्यंत बनविण्यात आले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडून पांदण रस्ते जीवघेणे झाले आहे. अतिवृष्टी ने झाडांची मुळे उघडी पडल्याने झाडे कधीही उन्मळून पडू बैलगाडीचेसुद्धा जाणे कठीण होऊन जाते. जनावरे पडतात व जखमी होता. शेतकरी व मजुरांना चिखलामुळे बुरशीजन्य आजार जडतात. शेतमजूरही रस्ते नसल्याने शेतात जाण्यास धजावत नाहीत.
पांदण रस्ते व्हावेत व प्रवासाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी शेतकरी, शेतमजूर आग्रही आहेत. पांदण रस्त्यासाठी ग्रामपंचायतीत ठरावही घेतला जातो. मात्र, त्याचेपुढे काहीच होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधींकडे गेल्यास केवळ आ? वासन देऊनच बोळवण केली जाते. हा प्रकार कुठेतरी थांबावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदा तरी या कामांचा मुहूर्त निघणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.