टॉप बातम्या

महसूल विभाग ऍक्शन मोडवर : अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : तालुक्यातील घाटावर रेतीची अवैध वाहतूक जोमात असल्याचे वृत्त माध्यमातून समोर येताच प्रशासन ऍक्शन मोडवर आले असल्याचे दिसून येत आहे.  
महसूल विभागाच्या पथकाने एका विना परवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर बेधडक कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार शहरात विना परवाना रेतीची वाहतूक करित असल्याची माहिती मिळताच मारेगाव तहसीलदार पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने अवैध गौण खनिज विरुद्ध धडक मोहीम राबवून शहरात होत असलेल्या अवैध वाहतुकीवर शुक्रवार दि 20 जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता चे दरम्यान, महसूल च्या पथकाने खरेदी विक्री परिसरातील हनुमान मंदीर जवळ ट्रॅक्टरचालकास रेती वाहतूक परवाना मागितला असता त्याकडे याबाबत कोणताही परवाना नसल्याने वाहन क्र.एम एच 29 बिवी 3804, ट्रॉली क्र एम एच 29 सि 6521 ह्या कारवाई करण्यात आली. हे वाहन राजू पुंडलिक कापसे यांच्या मालकीचे असल्याचे माहिती आहे. 

सदर कारवाई तहसीलदार दिपक पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, तलाठी चैतन्य कुमार शिंगणे यांनी केली. ह्या कारवाई ने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे दाणादाण उडाली असून महसूल विभाग ऍक्शन मोडवर आली आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();