सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : प्रभाग क्र 13 येथील लाच प्रकरणातील अडकलेले नगरसेवक अनिल गेडाम यास केळापूर सत्र न्यायालयाने आज तीन दिवसानंतर शनिवारला जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला. बुधवार पासून नगरसेवक जिल्हा कारागृहात होते.
मारेगाव नगर पंचायत चे नगरसेवक अनिल गेडाम यांनी एक दारू दुकान हटविण्याची तक्रार दाखल केला होती. तक्रार मागे घेण्यास पाच लाखाची मागणी करण्यात आली होती. तडजोडीत 90 हजार रुपये घेण्याचे ठरले असतांना ही लाच घेतांना नगरसेवक मागील बुधवारला ए सि बि विभागाच्या जाळ्यात अडकले होते.