सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
या कार्यक्रमाचे उदघाटक बाळासाहेब ठाकरे गटाचे गजानन भाऊ किन्हेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर गोरे (उपजिल्हा प्रमुख), तर प्रमुख अतिथी किशोर नांदेकर (तालुका प्रमुख वणी), विशाल किन्हेकर (तालुका प्रमुख मारेगाव), विजय मेश्राम (शहर प्रमुख) यांची उपस्थिती होती.
मारेगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, त्यात प्रवीण बलकी, तुकाराम वासाडे, सुरेश लांडे, विकास राऊत, उपसरपंच प्रशांत भंडारी, प्रवीण विखणकर, पवन जांभुळकर, सचिन ढोके, सुभाष गारगाटे, राजू ठक, अभी भोयर, निलेश घुमे, राजूभाऊ तुराणकर, गोवर्धन तोडासे, संदीप कारेकर, हरीश परचाके, भोजराज मस्की, डॉ बदकी, व अन्य बाळासाहेब ठाकरे गटाचे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते, या प्रसंगी ५२ नागरिकांनी सहभागी होऊन शिबिरात रक्तदान केले.