
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष अविनाश लांबट (Avinash lambat) यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याकडे दिला.
लांबट (Avinash lambat) यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, माझ्या पारिवारिक अडचणीमुळे मी पक्ष संघटनेसाठी पुरेसा वेळ देवू शकत नाही. करिता आपल्या पक्षाची मनसे तालुका अध्यक्ष मारेगाव पदाचा राजीनामा देत आहोत असे नमूद आहे.
सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता म्हणून सक्रीय असून गेल्या सहा महिन्यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून निष्ठेने प्रामाणिकपणे सर्व घटकांना बरोबर घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. आणि यापुढे ही करेन असे त्यांनी "सह्याद्री चौफेर" बोलतांना सांगितले.
दरम्यान राजू उंबरकर यांच्या निवासस्थानी अविनाश लांबट यांनी भेट घेतली, त्यांना आपल्या पारिवारिक समस्यांचे कारण देत लांबट यांनी राजीनामा दिला आहे.