सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : होऊ घातलेल्या अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होणार आहे. त्या अनुषंगाने "पदवीधर मेळावा" वणी विधानसभा क्षेत्र, काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रविवार दिनांक २२ - १- २०२३ रोजी शेतकरी मंदीर वणी येथे सकाळी ठीक १२ वाजता आयोजित केला असून, या मेळाव्यास वणी उपविभागामध्ये कार्यरत असणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले मार्गदर्शन करणार असल्याचे माहिती मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिली आहे.
या मेळाव्याला वणी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडी च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस कमिटीने केले. दरम्यान, मारेगाव तालुक्यातून मार्डी नांदेपेरा मार्गे ते जात असून मार्डी येथे प्रथम आगमनानिमित्त पटोले यांचे जंगी, आतिष बाजीने सकाळी १०.३० वा. भव्य स्वागत सत्कार करण्यात येणार आहे. तरी या स्वागत सोहळा कार्यक्रमाला मार्डी कुंभा परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही त्यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले. तसेच परिसरातील नागरिकांनासुद्धा उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.