सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत "गाडीवाला आया घरसें कचरा निकाल" असा स्वर कानी पडताच नागरिक आपल्या दारासमोर कचरा आणून ठेवतात. हे चित्र आता नित्याचेच झाले आहे.
घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात नगर पं. प्रशासन यशस्वी होत असले तरीही नागरिक मात्र,ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवू शकत नाही. तो आता वेगळा साठविण्याची तरतूद ICT मार्फत करण्यात येणार आहे. त्या करिता वेगवेगळ्या कचरा पेट्या देणार असल्याचे संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ICT BASED या अंतर्गत शहरातील मालमत्तावर टिकाऊ असा धातूचा बार कोड प्रत्येक घरी लावण्याचे काम शहरात सुरु येत आहे.
या मागील मूळ उद्देश असा की, शासनातर्फे देण्यात येणारा घनकचरा विल्हेवाट निधी याच कामी लावला जात आहे की, नाही याची खात्री होणार आहे. रोज स्कॅन करूनच कचरा गोळा केला जाणार आहे. नावीन्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात येणार आहे.
जो कचरा कुजतो तो ओला कचरा, न कुजणारा सुका कचरा अशी कचऱ्याची वर्गवारी करण्यात ही संस्था मदत करीत आहे. जाहिरातसाठी संपर्क : 7218187198