Page

खडकी फाट्या जवळ ऑटो पलटी; अकरा महिलांसह १२ जण जखमी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मौजा शिवनाळा येथील मजूरांना ऑटोत मारेगाव कडे घेवून येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून ऑटो पलटी झाल्याने तब्बल 12 मजूर जखमी झाल्याची घटना आज दि.26 सोमवार रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान, राज्य महामार्गावर असलेल्या खडकी फाट्याच्या आसपास घडली.
   
मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील मजुरांना ऑटोने  गोधणी येथे शेत कामासाठी घेऊन जात असतांना राज्य महामार्गावर खडकी फाट्या नजीक ऑटो'च्या समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने ऑटो चालकाचे अनियंत्रित होऊन पलटी झाला. यात स्वार असलेले बारा शेतमजूर जखमी झाले.

या अपघातात जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर बहुतांश गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ यवतमाळ, नागपूर येथे हलविण्यात आल्याचे समजते. या अपघातात ऑटो एन्ड बेंड झाले असे बघ्यांच्या चर्चेचा विषय होता.

या अपघातात जखमी नामे पार्वती रामभाऊ आत्राम (27), शकुली भुतू टेकाम (20) , अर्चना पैकू आत्राम (17), संगीता भीमा आत्राम (17), मंगला रामेश्वर टेकाम (27), राजाबाई नागो टेकाम (25), तानेबाई भीमा आत्राम (60), रविना शालिक टेकाम (22), कांताबाई पैकू टेकाम (40), ज्योती सुनील आत्राम (29), अर्चना राजू टेकाम (25) या महिला मजुरांचा समावेश असून राजू टेकाम (42) हा शेतमजूर जखमी आहे. हे सर्व मजूर मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील आहे.
       
मागील काही दिवसात मोकाट कुत्रे शहरासह ग्रामीण भागाकडे तसेच रस्त्यावर सैराट झालेले आढळून येत असून  मानवी अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे बोलल्या जातेय...