महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
7066027404

नागभिड : नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिंधिचक येथिल एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. काल दि.१७/११/२०२२ पासुन सदर महिला घरून बाहेर निघाली काल पासुन तिचा शोध घेत होते.मात्र, आज दुपारी तिचा मृत्यू देह प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चिंधिचक जवळील विहिरित तरंगताना आढळून आले.

मतृक ममता विकास दोडके वय (३५ वर्ष) असे महिलेचे नाव असून, ति तुकुम (तिवर्ला) येथिल रहिवासी असुन ति एक महिन्यापासुन चिंधिचक येथे बहिणीकडे राहत होती. काही दिवसांपासुन ति वेडसर पणे वावरत होती. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.असता पोलिस हेडकॉन्स्टेबल सावुसाकडे, सडमाके, यांनी घटनास्थळी येवून प्रेत विहिरीतुन काढुन छवविछेदनासाठी नागभिड येथे हलविण्यात आले पुढिल तपास नागभिड पोलीस करीत आहेत.
Previous Post Next Post