Page

अल्पवयीन वर वारंवार अत्याचार, पीडित चार महिन्याची गर्भवती

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
9011152179

मारेगाव : तालुक्यात अज्ञात अपघात,आत्महत्येच्या पाठोपाठ आता महिला, बाल अत्याचाराने डोकं वर काढत असल्याचे दिसून येतेय... अशातच लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ४ महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार दि.11 नोव्हेंबर रोजी समोर आला आहे. या बाबत मारेगाव पोलीस ठाण्यात युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील अकरावीची १६ वर्षीय विद्यार्थीनी ही आपल्या कुटुंबियांसह राहतेय. येथे असतांना अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत राजकुमार रामभाऊ मेश्राम (२३) रा. श्रीरामपुर, याने तिच्यावर अधून मधून अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ४ महिन्याची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक! प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात कलम 376,376 (1) (A), 376 (2) (J,N) 4,6 बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) सह विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करित आहे.