श्री.विठ्ठल रूक्मिणी महाविद्यालय सवना येथे प्राणिशास्ञ अभ्यास मंडळाचे उद्घाटन

लखन लोंढे | सह्याद्री चौफेर 

महागांव : तालुक्यातील श्री.विठ्ठल रूक्मिणी महाविद्यालय सवना येथील प्राणिशास्ञ विभागाद्वारे दि. ४ ऑक्टो. २०२२ रोजी प्राणिशास्ञ अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.सुरेल झोड (शिक्षक) तर प्रमुख वक्ता म्हणुन; प्रा.अनुरंजन टेकाडे (शिक्षक, प्राणिशास्ञ विभाग फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद) तसेच प्रा.जैस्वाल (शिक्षक) इंग्रजी विभाग प्रमुख व प्रा.नासिक शेख (शिक्षक) रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी श्री.विठ्ठल रूक्मिणी महाविद्यालय सवना येथे हे उपस्थित होते.

प्रसंगी टेकाडे (शिक्षक) यांनी अभ्यास मंडळात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचुन उद्घाटन केले. यात अध्यक्षपदी प्राजली देशमुख, उपाध्यक्ष वैष्णवी अल्लडवार, सचिव जयदत्त पुंडे, सहसचिव शुभम दयाल, कोषाध्यक्ष परिक्षीत पुंडे, सहकोषाध्यक्ष रोहन लोंढे व सदस्य म्हणुन; प्रफुल वऱ्हाडे, विशाल जाधव, अनिल साखरे, बाळु जांभुळकर, सुष्मिता राठोड, यश बोविंदवाड, आतिक युसुफ, प्रिया लागदुतकर, व वैष्णवी जांभुळकर यांची निवड करण्यात आली. प्रसंगी प्रा.अनुरंजन टेकाडे यांनी 'रिस्टोरेशन ऑफ किस्टोन स्पेसिज' या विषयांबद्दल समायोजीत मार्गदशन केले. त्यानंतर लगेचच हरित सेनेची स्थापना करण्यात आली प्रसंगी वनविभागातील वि.के.मुनेश्वर (वनपरिक्षेत्र अधिकारी, महागांव), सहाय्यक वनक्षेञपाल संतोष बदकुले, शिंदे व मनीषा मुजोळे (वनपरिक्षेञ काळी दौ). यांनी वन्यजिव सप्ताहाचे उद्घाटन केले व वन्यजिवांचे नैसर्गिक परिवार व माननी हस्तक्षेप या विषयावर मार्गदशन करीत हरित सेनेचे व वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन केले यात विशाल जाधव, सोनु राठोड व प्रिया भोने या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
(प्राणिशास्ञ अभ्यास मंडळाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी विदयार्थीनी)

प्रसंगी प्रा.जैस्वाल (शिक्षक) व प्रा.शेख (शिक्षक) यांनी वन व त्यांचे महत्व विषद केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.झोड (शिक्षक) यांनी अभ्यास मंडळास शुभेच्छा देत मार्गदशन केले. प्राणिशास्ञ विभाग प्रमुख प्रा.डॉ.पंकज चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित व सुञसंचालन केले तर प्रांजली देेशमुख यांनी पाहुण्याचा परिचय करुन दिला तसेच वैष्णवी अल्लडवार यांनी मागिल वर्षाचा अहवाल वाचन केला व अभ्यास मंडळाद्वारे नियोजीत भविष्यातील तरतुदींवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राणिशास्ञ अभ्यासमंडळ प्रभारी प्रा.अनिल खाडे (शिक्षक) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वियतेसाठी सहाय्याक नंदु टेकाळे, भगवान सरसमकर व प्राणिशास्ञ विभागातील बीएससी - भाग प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post