Top News

उभा ट्रक दिसला नसल्याने दुचाकीस्वाराची जबर धडक, जागीच ठार

नितेश वनकर | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : गेल्या चार दिवसापासून राज्य मार्गांवर बिघाड असलेला उभ्या ट्रकला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला, ही घटना मार्डी-खैरगाव राज्य मार्गांवरील रस्त्यावर शनिवार (3 संप्टें.) ला रात्री 10 वाजताचे दरम्यान, घडली.
     
संजय पांडुरंग धारणे (47) रा. किन्हाळा असे अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. 
     
संजय हे चिंचमंडळ कडून मोटारसायकल क्रमांक एम.एच.40 डी.6382 याने तालुक्यातील किन्हाळा येथील मूळ गावी येत असतांना मार्डी-खैरगाव राज्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला ना दुरुस्त असलेल्या उभ्या ट्रक ला जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
     
मृतकाच्या पाठीमागे आई, पत्नी,1 मुलगा, 2 मुली असा बराच मोठा आप्त परीवार आहे.
      
वणी-नांदेपेरा-मार्डी- खैरी या राज्य मार्गांवर रात्री बेरात्री नको तिथे ट्रक उभे असतात, शिवाय रस्त्याच्या कडेला वाहने उभी करीत असतांना वाहन धारक दिशादर्शक संकेत लावत नसल्याने या रस्त्यावर लहान-सहान वाहन धारकांना पुढील अंदाज चुकून अपघाताला सामोरे जावं लागत असून प्रवाशीयांना जीव गमवावा लागत आहे. 
Previous Post Next Post