सह्याद्री चौफेर | न्यूज
केळापूर : तालुक्यातील अर्ली येथील अजय किसन धुर्वे हा विद्यार्थी ग्रज्युएट अटीट्यूड टेस्ट बायोटेक्नॉलॉजी (गॅट बी) 2022 या परीक्षेत एस.टी. (ST) कॅटगीरी मधुन भारतातून बारावा रँक मिळवून पास झाला आहे.
सदर विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आई वडील लोकांच्या शेतात मोलमजुरी करून तसेच मिळेल ते काम करून त्याला शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी झाले असुन बीएससी चे शिक्षण तेलंगणा राज्यातील आदीलाबाद येथे झाले.त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे आहे. याकरिता केंद्र सरकारच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी मंत्रालयातर्फे बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट कडून घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट ॲप्टीट्यूड टेस्ट फाॅर बायोटेक्नॉलॉजी (गॅट बी) ही परीक्षा 83 टक्के घेऊन भारतातून ऑल इंडिया रँकिंग बारावा नंबर पटकावला.पुढील शिक्षणाकरिता केरळमधील तिरुअनंतपुरम येथील राजीव गांधी सेंटर फाॅर बायोटेक्नॉलॉजी मध्ये निवड झाली आहे.
पुढील शिक्षण तो तेथे घेणार आहे. शास्त्रज्ञ व्हायचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करत आहे,त्याला आपल्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव असुन आई वडिलांचे नाव मोठे करायचे असे त्यांनी आम्हच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले तसेच मुलांच्या यश मुळे आई वडील आनंदीत झाले असुन पुढील शिक्षणासाठी आम्ही कुठे तरी कमी पडतो की काय यांची चिंता असुन या विभागाचे आमदारांनी तसेच शासनाने व समाजातील नागरिकांनी आर्थिक मदत करावी अशी विनंती केली आहे. अजय ला मिळालेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आदिलाबाद चे जिल्हाधिकारी ,वन आणि पर्यावरण मंत्री जोगी रामण्णा व प्रोजेक्ट ऑफिस आदिलाबाद कडून सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात आमदार जोगीरामन्ना यांनी जोगू फाउंडेशन तर्फे पुढील शिक्षणाकरिता 35 हजार रुपयाची मदत जाहीर केली.
अजयच्या यशाची ही वार्ता माहीत होताच महाराष्ट्रातून वाटसप माध्यमाने शुभेच्छा दिल्या जात आहे, ही माहिती पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू सोयाम यांना कळताच ते आपल्या मित्र परिवारासह अजयचे गाव अर्ली येथे जाऊन अजय व अजयच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन सत्कार केला यावेळी रमेश गेडाम , नागेश्वर मडावी विनोद कनाके सचिन पत्रकार गजानन कुमरे व ग्रामस्थ उपस्थित होते.