सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : संतधार पावसाने नदी नाल्या काठावरील वणी तालुक्यातील अनेक गावांतील शेत जमिनी पाण्याखाली आल्या आहे. तसेच पुराचे पाणी चक्क घरात शिरल्याने गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
यासाठी विविध स्तरावरून पुरग्रस्त गावातील नागरिकांना वेगळवेगळ्या स्वरूपात मदत पुरवल्या जात आहे. अशातच लाठी गावातील युवकांना पुरग्रस्त गावात चाऱ्याची भीषण टंचाई असल्याने जनावरे उपाशी असल्याची माहीती काल दिनांक 23 जुलै ला मिळाली.
एक हात मदतीचा म्हणून रांगणा भुरकी या गावातील शेतकऱ्यांच्या जनावराला एक सप्ताह पुरेल एवढा चारा लाठी गावातील युवकांनी गावातील प्रत्येकाच्या घरून चारा गोळा करून वाहनाने आज दिनांक 24 जुलै ला रांगणा भुरकी येथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला त्यामुळे लाठी गावातील युवकांचे गाव वर्गातून कौतुक होत आहे.