विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाले अरविंद ठाकरे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कुंभा मार्डी विभागात ते सतत मदत करित असतात. मागील पंधरा दिवसापासून सतत संततधार पाऊस अधून मधून येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत असताना अशातच वर्धा नदी पात्रात पाणी सोडल्याने नदी काठावरील गावात, शेतात, घरात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,
वणी मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या पुराणे हजारों हेक्टर जमीन बाधित होऊन जन जीवन विस्कळीत झाले असे विदारक चित्र पाहुण सरपंच अरविंद ठाकरे (कुंभा) यांनी आपटी, वनोजा, सावंगी आदी गावातील पूर पीडित कुटुंबियांची भेट घेवून अशा कठीण काळात शक्य ती तात्पुरती मदत म्हणून पंधरा दिवस पुरेल एवढं अन्न धान्य किराणा किटचे वाटप केले,असे उल्लेखनीय कार्य त्यांचे सुरूच आहे.
उपविभागातील पूर परिस्थितीती ओसरली असली तरी, परिस्थिती मात्र बिकट आहे. अनेकांचे घरातील अन्नधान्य पुरात वाहून गेल्याने मोठ संकट त्यांच्या समोर उभं ठाकले असल्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात म्हणून अरविंद ठाकरे व त्यांची सहकारी टीम पूर पीडित गावात जाऊन त्यांची भेट भलाई घेवून त्यांना दिलासा देत आहे. शक्य ती मदत करित आहे.मार्डी कुंभा या विभागाला खरं तर प्रशासन व राजकीय नेत्यांनी सढळ हाताने तात्काळ दखल घेवून मदत करायला हवी होती,
परंतु असे न होता केवळ निवेदने देवून प्रसिद्धी मिरवत बघ्याची भूमिका घेत असतांना नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे पूर पीडितांच्या मदतीसाठी समोर आले. तालुक्यातील आपटी, वनोजा देवी, सावंगी आदी गावातील नागरिकांची भेट घेवून त्यांची विचारपूस करून धिर देत पीडित परिवरांना एक हात मदतीचा म्हणून पंधरा दिवस पुरेल असे अन्न धान्य किट चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पशुधन पालकांची चाऱ्याची अडचण लक्षात घेत दोन ट्रॅक्टर चारा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले.
या प्रसंगी रंगनाथ स्वामी पत संस्थेचे ऍड देविदास काळे, बर्डे साहेब, सुनील वरारकर, डिमन टोंगे, अजय आसुटकर, व आपटी येथील महिला सरपंचा सातपुते आदी उपस्थिती होते. या उपक्रमात सहभागी झालेले मयूर ठाकरे, गजानन ठाकरे, मारोती मुपाडवार, संदीप डुकरे, वैभव डुकरे, सुरेश घोटेकर, राकेश ठाकरे आदीनी अथक परिश्रम घेतले.